Suryadatta Education Foundation’s
Bansi-Ratna Charitable Trust
Online form for felicitation of meritorious students Click Here
Every year, Suryadatta Education Foundation's Bansi-Ratna Charitable Trust felicitates meritorious students (as per the criteria laid by the committee members) who have completed their 10th / 12th in the same academic year. This year also Suryadatta Education Foundation’s Suryadatta Group of Institutes felicitates Jain / Gujarati / Marwadi / Agarwal students by conferring the Medal, Academic Excellence Award and Certificate of Merit at the hands of the distinguished personalities and Chairman of the foundation.
Elegiblity : To be eligible for felicitation program in 2021, candidate should have completed their X, XII in the Academic year 2020 - 21 and their results should have been declared by the month of 2021. Students have to be remain present in person to receive the same.
The felicitation committee will scrutinize the documents and will select the deserving candidates.
बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूट्स संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी 'बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार', 'समाज शिरोमणी', 'समाजभूषण', 'समाजरत्न', 'मानवसेवा' पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप असते. दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
त्याचबरोबर जैन, गुजराती, माहेश्वरी व अगरवाल समाजातील दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो. या विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या, तसेच जीवनाच्या योग्य वाटा दाखविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण असतो. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक, बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक, वाणिज्य शाखेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक, तर विज्ञान शाखेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, पदक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि गुणपत्रक सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गौरव समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे. www.suryadatta.org किंवा www.bansiratna.org या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला गुणवंत विद्यार्थी सन्मान अर्ज (मेरिटोरियस स्टुडन्ट फेलिसिलेशन फॉर्म) भरणे आवश्यक आहे.
जैन समाजातील पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींनी 'समाज शिरोमणी', 'समाजभूषण', 'समाजरत्न', 'मानवसेवा' पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत. आपली स्वतःची माहिती, परिचयपत्र, फोटो, आजवरच्या उल्लेखनीय गोष्टी, आधी मिळालेले पुरस्कार आदी माहिती कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज पाठवत आहात, त्यावर उल्लेख करून This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी ९७६३२६६८२९ किंवा ८९५६९३२४०० किंवा ९८८१०३७७७७ यावर संपर्क करावा. सत्कार समिती आलेल्या अर्जाची छाननी करून योग्य व्यक्तींची निवड करेल. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२१ अशी असून, हा सत्कार समारंभ १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org किंवा www.bansiratna.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया व सचिव सिद्धांत चोरडिया यांनी दिली.
Online form for felicitation of meritorious students Click Here
Invitation Card of Previous Year
For more details click here..